Tuesday 18 August 2020

Mangala Gauri Aarti words in Marathi

The name Gauri is associated with Goddess Parvati who is Lord Ganesha's mother. The fast that is referred to as Mangala Gauri is one taken up by a married lady, the word 'Mangala' referring to something auspicious. These women take up the fast as a prayer to the Goddess for marital bliss and the long and happy life of their husbands and children. The vow is taken over a span of four Tuesdays during the month of Shravan.



जयदेवी मंगळागौरी ओंवाळीतें सोनियाताटी

रत्नांचे दिवे माणिकांच्या वाती हिरेया मोती ज्योती धृ .

मंगळमूर्ती उपजली कार्या प्रसन्न झाली अल्पायुषी राया

तिष्ठली राजबाळी अहेवपण ध्यावया जय .

पूजेला आणिती जाईजुईच्या कळ्या ।। 

सोळा तीकटी सोळा दुर्वा ।। सोळा परिची पत्री ।। जाईजुई आबुल्या

शेवंती नागचाफे ।। पारिजातकें मनोहरें  ।।

गोकर्ण महाफुले नंदे टे  तग रें पूजेला आणिली ।। ।। 

साळीचे तांदुळ मुगाची डाळ ।। आळणी खिचडी रांधिती नारी ।।

आपुल्या पतीलागी ।। सेवा करिती फार ।। जय . ।।

डुमडुमें  डुमडुमें वाजंत्री वाजती ।। कळावी कांक णे गौरीला शोभती ।।

शोभती बाजुबंद ।। कानी कापांचे गाभे ।। ल्यायिली अंबा शोभे ।। ।।

न्हाऊनी माखुनी मौनी बसली ।। पाटावाची चोळी क्षीरोदक  नेसली ।। 

स्वछ बहुत होऊनी ।। अंबा पूजून बेसली ।। ।। 

सोनियाचे ताटी घातिल्या पंचारती ।। मध्ये उजळती कपुरीच्या वाती ।। करा धूप दीपार्ती ।।

नेवेध्य षडस पक्वान्ने ताटी भरा बोने ।। ।। 

लवलाहें ति घें काशीसी निघाली ।। माउली मंगळागौर भिजवू विसरली

मागुती परतुनियां आली ।। अंबा स्वयभू देखिली ।।

देऊळ सोनियांचे ।। खांब हिऱ्यांचे ।। कळस मोतियांचा ।। ।। जय देवी मंगलगौरी ।। 

 

No comments:

Post a Comment